Wai Gymkhana – Sports and fitness institution established in 1992
Wai Gymkhana – Serving the community through sports and fitness since 1992.

We offer a wide range of indoor and outdoor sports programs designed to promote fitness, discipline, and sportsmanship for all age groups.

+91 92708-12345 Wai Gymkhana, Madhali Aali, Kanya Shala Area, Wai – 412803, Satara, Maharashtra Mon - Sat 5.30 - 21.30, Sunday CLOSED
Follow Us
  /  Blog   /  वाई जिमखाना आयोजित स्व. प्रतापराव भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा शानदार समारोप
वाई जिमखाना आयोजित स्व. प्रतापराव भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ

वाई जिमखाना आयोजित स्व. प्रतापराव भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा शानदार समारोप

वाई जिमखाना आयोजित स्व. प्रतापराव भोसले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ

वाई जिमखाना व किसान वीर महाविद्यालय, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त १९ मे २०२६ ते २१ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा – पर्व दुसरे” या भव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हाभरातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पर्धेदरम्यान झालेल्या चुरशीच्या सामन्यांमुळे संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला होता. खेळाडूंचा उत्साह, उत्कृष्ट खेळ आणि प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद यामुळे स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

समारोप समारंभास सातारा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सुधाकर शानबाग, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक सुरेश सादले, सातारा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष राजदीप माजगावकर, मनोज कांन्हेरे, उपसचिव निलेश फणसळकर, किसान वीर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गुरुनाथ फगरे तसेच उद्योजक मोहन आबा भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विविध गटातील विजेते खेळाडू

९ वर्षांखालील गट

  • मुलांमध्ये विराज फुले विजेता तर रिषित कदम उपविजेता ठरला.
  • मुलींमध्ये दिविरा सावंत विजेती तर रिया पिसाळ उपविजेती ठरली.

११ वर्षांखालील गट

  • मुलांमध्ये अक्षय कोल्हापुरे विजेता तर प्रत्यूष पवार उपविजेता ठरला.
  • मुलींमध्ये आरोही अर्जुगडे विजेती तर जीयारा दोषी उपविजेती ठरली.
  • दुहेरी गटात कनक जोशी व वरद कोल्हापुरे या जोडीने विजेतेपद पटकावले, तर अन्वय हवळ व कौस्तुभ फुले ही जोडी उपविजेती ठरली.

१३ वर्षांखालील गट

  • मुलांमध्ये विराज अर्जुगडे विजेता तर अभय कोल्हापुरे उपविजेता ठरला.
  • मुलींमध्ये आराध्या हगवणे विजेती तर विभावरी कांबळे उपविजेती ठरली.

१५ वर्षांखालील गट

  • मुलांमध्ये श्लोक भोसले विजेता तर आराध्य पवार उपविजेता ठरला.
  • मुलींमध्ये श्रद्धा इंगळे विजेती तर रसिका पवार उपविजेती ठरली.

१७ वर्षांखालील गट

  • मुलांमध्ये अर्जुन जाधव विजेता तर कौस्तुभ फुले उपविजेता ठरला.
  • मुलींमध्ये श्रद्धा इंगळे हिने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले, तर सूर्या कणसे हिने उपविजेतेपद मिळवले.
  • दुहेरी गटात अर्जुन जाधव व देवांश रैनाक या जोडीने विजेतेपद पटकावले, तर कौस्तुभ फुले व शरव लोखंडे ही जोडी उपविजेती ठरली.

१९ वर्षांखालील गट

  • मुलांमध्ये श्रेयांस फणसळकर विजेता तर कौस्तुभ फुले उपविजेता ठरला.
  • मुलींमध्ये श्रद्धा इंगळे विजेती तर शर्वरी मोरे-पाटील उपविजेती ठरली.

खुल्या गटातील सामने

  • मेन्स सिंगल्समध्ये अभिषेक मोहिते विजेता तर नरेंद्र जगताप उपविजेता ठरला.
  • मेन्स डबल्समध्ये अभिषेक मोहिते व श्रीधर तपासे या जोडीने विजेतेपद पटकावले, तर अथर्व मोहिते व शंतनू दिवेकर या जोडीने उपविजेतेपद मिळवले.
  • मिक्स डबल्समध्ये अभिषेक मोहिते व अनन्या काटे या जोडीने विजेतेपद पटकावले, तर नरेंद्र जगताप व सूर्या कणसे ही जोडी उपविजेती ठरली.
  • ३५ वर्षांवरील मेन्स डबल्समध्ये निलेश फणसळकर व वैभव फुले या जोडीने विजेतेपद मिळवले, तर विक्रम राजपूत व रोहन शेलार ही जोडी उपविजेती ठरली.
  • ५५ वर्षांवरील मेन्स डबल्समध्ये अवधूत जोशी व संजय भागवत या जोडीने विजेतेपद पटकावले, तर नंदकुमार चोरगे व सायमन नडार या जोडीने उपविजेतेपद मिळवले.

या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वाई जिमखान्याचे अध्यक्ष अमर कोल्हापुरे यांनी विशेष पुढाकार घेतला. स्पर्धा प्रमुख वैभव फुले यांनी स्पर्धेचे नियोजन, वेळापत्रक, व्यवस्थापन आणि समन्वय अत्यंत प्रभावीपणे सांभाळला. आयोजनात अमीर बागुल आणि सायमन नडार यांनीही मोलाची भूमिका बजावली.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रीती कोल्हापूरे यांनी प्रभावी आणि आकर्षक शैलीत केले.

स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी तसेच जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणारी ठरली.

ADD COMMENT